शेवटी शेवटी…

शेवटी शेवटी खुप आल्या सरी ॥ चातका सारखा जन्म गेल्यावरी ॥

स्तुत्य होते तरी, सत्य होते कटु प्रेम केलेस तू, जीव गेल्यावरी ॥१॥ काळजाने जणू चुकविले सम् पुन्हा मिटले सारखी, वाजली बासरी ॥सा

फार जखमा दिल्या सोबतीने तुझ्या अने दुख्खा आता, घालतो फुंकरी ॥३॥ एवढा शांत दिसलो जरी आरसा आत आहे सुरु, चेंगराचेंगरी ॥गा माणसा पाहता दोन जाती तुझ्या

एक मारेकरी, एक वाटेकरी ।।५।। जन्म ही आपुला मरण ही आफुले …. या घरातून मी, चालली त्या घरी ॥६॥

  • वैभव जोशी

हे ही असेच होते, ते ही तसेच होते…

हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते…

केले न बंड कोणी… त्या घोषणाच होत्या
ज्यांनी उठाव केला; तेही घसेच होते

आला न गंध त्यांना… केव्हाच चंदनाचा
सारे उगाळलेले; ते कोळसेच होते

तू भेटलीस तेव्हा, मी बोललोच नाही
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते

होती न ती दयाही… ती जाहिरात होती
जे प्रेम वाटले ते, माझे हसेच होते

झाला उशीर जेव्हा, हाका तुला दिल्या मी
मातीत पावलांचे… काही ठसेच होते

कवी – सुरेश भट